यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१ जून २४ शनिवार
सातपूडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यात गाव,वस्ती व पाडयांवर आदिवासी बांधव राहात असून मागील आठवड्यात रविवार रोजी थोरपाणी या वस्तीवरील नानसिंग पावरा यांचे मातीचे घर वादळात कोसळुन जमीन दोस्त झाले होते व या दुदैवी घटनेत त्या एकाच परिवारातील चार लोक ढिगाऱ्याखाली दाबले जावुन गुदमरून चौघांचा मृत्यु झाला होता.सदरील घटना हि हृदय पिळवटून टाकणारी असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आली.
दरम्यान सदरील घटना घडली त्या आंबापाणी गावाजवळ असलेल्या थोरपाणी या पाडयावर १५० कुटुंबाची वस्ती असून या ठीकाणी एकाही आदिवासी बांधवास अद्यापपर्यंत शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही.अशा यावल तालुक्यात किती आदिवासी पाडे व वस्ती आहेत मग त्यांना शासन घरकुलाचा लाभ का नाही देण्यात येत आहे ? असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे.थोरपाणी येथील एकाच कुटुंबातील चौघांचा जिव हा शासनाच्या उदासीनतेमुळे गेला असे म्हणावे लागेल व जर अशा प्रकारे जिव गेल्यावर प्रशासनाला जाग येत नसेल तर मग अजुन शासन किती आदिवासी कुटुबांचा बळी घेणार आहे ? अशी विचारणा मनसेच्या वतीने विचारण्यात आला आहे.दरम्यान हि समस्या पुन्हा उध्दभवू नये याकरिता मनसेच्या वतीने तालुक्यातील आदिवासी बांधवांना तात्काळ घरकुलाचा लाभ देण्यात यावा या मागणीचे निवेदन नुकतेच यावल पंचायत समितीचे कक्ष अधिकारी जि एम रिंधे यांना देण्यात आले आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील गाव व पाडयांवर राहणाऱ्या आदिवासी बांधवांना शासनाच्या वतीने त्यांच्या हक्काची मिळणारे घरकुल देण्यात यावी अन्यथा भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांना सोबत घेवून आंदोलन करेल असा ईशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.सदर निवेदनावर मनसेचे राज्य उपाध्यक्ष जन व विधी विभाग जळगाव चेतन आढळकर,मनसेचे यावल तालुका अध्यक्ष मुकेश बोरसे, किशोर नन्नवरे तालुका संघटक,गौरव कोळी शहराध्यक्ष,श्याम पवार,कुणाल बारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.