दरम्यान एकनाथ खडसे यांनी एक्झिट पोल्सच्या महाराष्ट्रातील महायुतीला मिळणाऱ्या आकड्यांबाबत भाष्य केले होते ते म्हणाले होते की, भारतीय जनता पक्ष ज्यांनी रात्रंदिवस काम करून उभा केला त्यांचा हा पक्ष असतांना इतराच्या हातामध्ये जाणे आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा हा परिणाम आहे हे जनतेला वाटले त्यामुळे अजित पवार यांना या निवडणुकीत फार प्रतिसाद दिसत नाही तसेच शिवसेना शिंदे गटालाही जास्त प्रतिसाद दिसत नाही त्यामुळे भारतीय जनता पक्षाला चिंता करण्याची गरज आहे असे खडसे यांनी म्हटले होते.एकनाथ खडसे यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देतांना गिरीश महाजन म्हणाले,त्यांना म्हणा तुम्ही आमची चिंता करु नका.तुम्ही नेमके कोणत्या पक्षात आहात आधी ते सांगा आणि मग बोला अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली.दरम्यान तीस वर्षांहून अधिक काळ भारतीय जनता पार्टीत राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे पुन्हा भाजपात परतणार आहेत.लोकसभा निवडणुकीच्या आधी यासंदर्भात एकनाथ खडसे यांनीच याबाबत घोषणा केली मात्र त्यानंतर आतापर्यंत एकनाथ खडसे यांचा भाजपात प्रवेश झालेला नाही यावरूनच गिरीश महाजन यांनी त्यांना टोला लगावला आहे.