आज निवडणुकांच्या निकालाच्या दिवशीही काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत घोषणाबाजी करत आहेत. अशातच ईव्हीएमवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर राजस्थानमधील जयपूर मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार प्रताप सिंह खाचरियावास यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ईव्हीएमवर जर इतके प्रश्न उपस्थित केले जात असतील तर निवडणूक आयोगाने ईव्हीएम लोकांसमोर ठेवायला पाहिजे असे मत त्यांनी मांडले.जर ईव्हीएमवर इतके प्रश्न उपस्थित होत असतील तर निवडणूक संपल्यावर निवडणूक आयोगाने पुढे येऊन ते एका हॉलमध्ये ठेवायला पाहिजे त्यानंतर तिथे सुरक्षा पुरवत ज्या कुणाला ईव्हीएम हॅक करायचे आहेत त्यांना करू द्यायला पाहिजे.ईव्हीएममध्ये प्रोग्रामिंग कोण अपलोड करतय ? तुम्ही उमेदवारांना तेच प्रोग्रामिंग देत नाही याबद्दल चर्चाही होत नाही व हा कार्यक्रम उमेदवारांना उपलब्ध करून द्यावा अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने द्यायला पाहिजे पण निवडणूक आयोगाला हे करायचे नाहीय पण त्यांनी हे करावे जेणेकरून सत्य बाहेर येईल.निवडणूक आयोग हे का करत नाही ? निवडणूक आयोग पारदर्शक असायला हवा.निवडणूक आयोगाने हॅक करणाऱ्याला बक्षीस जाहीर केले पाहिजे आणि जर कोणी ते हॅक करू शकले तर ते बदलायला पाहिजे असे मत प्रतापसिंह खाचरियावास यांनी व्यक्त केले आहे.