दरम्यान संपूर्ण शरीरभर फ्रॅक्चर आणि प्लॅस्टर लोपलेले मोदी हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या कुबड्या घेऊन चालत आहेत व त्या कुबड्यांच्या आधारेच त्यांना सरकार चालवावे लागेल व या कुबड्याही अखेरपर्यंत साथ देतील का याची गॅरंटी नाही.मोदींच्या भाजपाला २४० जागा मिळाल्याचे सांगितले जाते व या संख्येतही घोळ आहे.एनडीए म्हणून २९२ जागा दाखवल्या जात आहेत ज्या फसव्या आहेत.तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी मोदींनी बहुमताचा कागद राष्ट्रपती भवनात सादर केला आहे.तरीही तो कागद आणि त्यावरची बहुमताची संख्या म्हणजे त्यांच्या एम.ए.इन एन्टाय पॉलिटिक्स या डिग्रीप्रमाणे रहस्यमय असेल.मोदींकडे स्वतःचे बहुमत नाही व कुबड्यांवरचे बहुमत मोदींच्या बाणेदार स्वभावाला मानवणारे नाही त्यामुळेच भारतीय जनतेने अत्यंत सभ्यपणे मोदींना सत्तेवरुन खाली उतरण्याचा संदेश दिला आहे.उगाच रेंगाळू नका आणि स्वतःची बेअब्रू करुन घेऊ नका पण सभ्यता आणि संस्कृती या शब्दांशी मोदी आणि अमित शाह या महाशयांचा संबंध आला नसावा त्यामुळेच मोदी सरकार नाही एनडीए सरकार स्थापन होत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.मोदींना या वेळी राम पावला नाही कारण प्रभू श्रीराम अहंकाराचा शत्रू आहे,अहंकाराचा पराभव करुन रामाने अयोध्येचे रामराज्य स्थापन केले.भाजपाला मिळालेल्या २४० जागा हा मोदी ब्रँडचा चमत्कार नाही.राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांच्या मदतीने भाजपाने ही संख्या गाठली आहे.मोदींनी महाराष्ट्रात १८ सभा आणि अनेक रोड शो केले.१८ पैकी १४ जागांवर भाजपाचा पराभव झाला.मोदी नागपुरात गेले नाहीत तिथे भाजपाचे नितीन गडकरी विजयी झाले.भारतीय जनता पक्षाचा आरोप होता की महाराष्ट्रात मोदींचा फोटो लावून शिवसेनेचे खासदार जिंकले.भाजपाचा भ्रम लोकांनी तोडला.उद्धव ठाकरेंचा चेहरा घेऊन शिवसेनेचे नऊ खासदार जिंकले व शरद पवारांचा चेहरा घेऊन राष्ट्रवादीचे आठ खासदार विजयी झाले.मोदी मोदी करणाऱ्या भाजपाच्या खासदारांची संख्या २३ वरुन ९ वर आली.महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या आहे त्या मोदींशिवाय असा उल्लेख करत सामनातून टीका करण्यात आली आहे.