मोदींनी बुधवारी सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.त्यापूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची अखेरची बैठक घेतली.आघाडी सरकारचे नेतृत्व करण्याचा अनुभव असल्याने केंद्रातील सरकार आघाडीचे असले तरी नीट कारभार करता येऊ शकेल अशी ग्वाही मोदींनी मावळत्या सरकारमधील सहकारी मंत्र्यांना दिल्याचे समजते.मोदींच्या निवासस्थानी एनडीएच्या तासभर झालेल्या बैठकीत नितीशकुमार व चंद्राबाबू नायडू या दोन्ही प्रमुख घटक पक्षांच्या नेत्यांनी भाजपला सरकार बनवण्यासाठी पाठिंब्याचे लेखी पत्र दिले.या बैठकीमध्ये नितीशकुमार यांनी मोदींना लगेचच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करण्याची सूचना केली.‘एनडीए’ बरोबर असल्याची ग्वाही नायडू यांनी दिल्लीत येण्यापूर्वी विजयवाडा येथे दिली.