Just another WordPress site

धनुष्यबाण गोठवल्याबद्ल आज संध्याकाळी ६ वाजता मातोश्रीवर तातडीची बैठक

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट यांच्यात सुरू असलेल्या युद्धातील पहिल्या मोठ्या लढाईत उद्धव यांना शनिवारी रात्री मोठा हादरा बसला.धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा अंतरिम निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे.त्याचसोबत दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही असा निर्णयही दिला.या सगळ्या मोठ्या घडामोडीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहे.आज सायंकाळी ६ वाजता उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करतील.मातोश्रीवरील सेना नेते उपनेत्यांच्या बैठकीनंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे.
अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने तीन ऑक्टोबर रोजी जाहीर केली.त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी चार ऑक्टोबर रोजी शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळावे या मागणीसाठी निवडणूक आयोगाकडे दावा केला.त्या पत्राची प्रत आयोगाने ठाकरे गटाला पाठवली होती.त्यावर ठाकरे गटाने उत्तर दिले नसल्याचे शुक्रवारी पत्र लिहून निदर्शनास आणून देण्यात आले व शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत ठाकरे गटाने आपले उत्तर सादर करावे असे निर्देश आयोगाने दिले होते.त्यानुसार ठाकरे गटाच्या वतीने शनिवारी ऍड.देवदत्त कामत,विवेक सिंह,अमित तिवारी या वकिलांनी निवडणूक आयोगाकडे २५ पानी म्हणणे सादर केले.दोन्ही गटांनी सादर केलेल्या दाव्याप्रतिदाव्यांची पडताळणी करून शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही गोठवण्याचा अंतरिम निकाल निवडणूक आयोगाने दिला.उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री येथे शिवसेना नेत्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव यांनी शिवसेना नेत्यांना आगामी रणनीतीबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.शिवसेना नेत्यांच्या बैठकीत नेमके काय घडले याबाबत आमदार भास्कर जाधव यांनी माहिती दिली आहे.’काल झालेल्या निर्णयामुळे शिवसैनिकांसह राज्यातील जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आणि संताप आहे.स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून शिवसेनेला त्रास दिला जात आहे.मात्र शिवसेनेला जितका त्रास दिला जाईल तितके  लोक आपल्यामागे ठामपणे उभा राहतील.त्यामुळे आपण संयम ठेवला पाहिजे अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना दिल्याचे  भास्कर जाधवांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.