भुसावळ ते जळगाव चौथ्या रेल्वे मार्गाचे ७० टक्के काम पुर्ण
पंकज डावरे,उपमुख्य अभियंता,रेल्वे निर्माण विभाग यांची माहिती
भुसावळ-पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- भुसावळ ते जळगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे मागील वर्षी रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाले. त्याचाच परिपाक म्हणून भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे नव्याने भुसावळ ते जळगाव चौथ्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.आतापर्यंत सदरील काम हे ७० टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर २२ अखेर पर्यंत या चौथ्या रेल्वे मार्गाचे काम पुर्ण करण्यात येईल अशी माहिती पंकज डावरे,उपमुख्य अभियंता रेल्वे निर्माण विभाग यांनी दिली आहे.
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देशभरातील रेल्वे,रस्ते व शहरी पायाभूत प्रकल्प हे लोकसभेपुर्वी पूर्ण करण्याचे ठरविले आहे.यामध्ये भुसावळ विभागातील भुसावळ जळगाव तिसऱ्या रेल्वे मार्गाचा समावेश यामध्ये समावेश करण्यात आलेला असून सदरील प्रकल्प हा मागील वर्षी डिसेंबर मध्येच पूर्ण झाला आहे.या रेल्वे मार्गाचे पहिल्या टप्प्यात काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे दुसऱ्या टप्प्यात भुसावळ जळगाव दरम्यान मागील वर्षांपासून चौथ्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेतले आहे.या प्रकल्पाकरिता रेल्वे मंत्रालयाने २.६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आतापर्यंत १.८० कोटी रुपये कामाकरिता खर्च करण्यात आले आहे.आतापर्यंत सदरील काम हे ७० टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर २२ अखेर पर्यंत या चौथ्या रेल्वे मार्गाचे काम पुर्ण करण्यात येईल अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.