मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवले आहे. याशिवाय उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला आता शिवसेना हे नावही वापरता येणार नाही.उद्धव ठाकरें करीता हा मोठा धक्का मानला जात आहे.धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेचे नवीन चिन्ह काय असणार?अशा चर्चा सुरु असतानाच आता दिले आहेत.मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत आमचे चिन्ह म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे असे म्हटले आहे.यावेळी त्यांनी फोटोच्या मागील बाजूला वाघाचा लोगो ठेवला आहे.त्यामुळे शिवसेनेचे नवीन चिन्ह वाघ असणार का? याबाबत चर्चाना उधाण आले आहे.नार्वेकर यांच्या या ट्विटला अनेक लाईक्स आणि कॉमेंट्स मिळत आहेत.
दरम्यान धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबतचा फोटो शेअर करत जिंकून दाखवणार असा एल्गार केला आहे.त्यामुळे आगामी लढाईसाठी ते सज्ज असल्याचे दिसते. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाला सोमवारपर्यंत नव्या चिन्हासाठी पर्याय द्यावा लागणार आहे.त्यानुसार तीन चिन्हांची निवड करून निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागणार आहेत.