यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ जून २४ बुधवार
तालुक्यातील सावखेडासीम येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीच्या कारणावरून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील सावखेडा सीम येथील शेतकरी अनिल प्रकाश पाटील यांच्यावर अडीच लाखापर्यंत कर्ज झाले होते व या कर्जबाजारीमुळे तो त्रस्त झाल्याचे दिसून येत होते.दरम्यान दि.२ जून पासून घरात कोणाला काही एक न सांगता तो निघून गेला होता.त्याचा शोध कुटुंबातील मंडळीने सर्वत्र घेतला असता तो मिळून आला नाही.दरम्यान गाव शिवारातील कादर मोहम्मद तडवी यांचे शेतातील विहिरीत अनिल पाटील हे मृत अवस्थेत आढळून आले आहे.मोहम्मद तडवी हे त्यांचे शेतातील गेल्या अनेक दिवसापासून बंद असलेले विजपंप सुरू करण्यास गेले असता त्यांना विहिरीतून दुर्गंधी आली त्या दुर्गंधीच्या निकषाने त्यांनी विहिरीत डोकावून बघितले असता अनिल पाटील यांचे प्रेत आढळून आले.सदर खबर पोलीस पाटील पंकज बडगुजर यांना दिली असता त्यांनी यावल पोलिसात कळविले व त्यानुसार यावल पोलिसांनी त्यांचे प्रेत विहिरीबाहेर काढले.यावलच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ.प्रशांत जावळे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले.यावल पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ,हॅड काँस्टेबल राजेंद्र पवार व वसीम तडवी आणि सहकारी करीत आहेत.आत्महत्या केलेल्या अनिल पाटील यांच्या कुटुंबात पत्नी,दोन भाऊ,मुलगा,मुलगी,आई असा परिवार आहे.