मनसेच्या अध्यक्षपदी राज ठाकरेच !! पक्षांतर्गत निवडणुकीत सन २०२८ वर्षांपर्यंत या पदावर राहण्याचा ठराव मंजूर
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ जून २४ गुरुवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाली असून आज दि.१३ जून रोजी मनसेची पक्षांतर्गत निवडणूक पार पडली व या निवडणुकीत राज ठाकरेंची पक्षाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.“सन २०२३ ते २०२८ या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरेंची केंद्रीय निवडणूक समितीने घोषणा केली आहे आणि अभिनंदनाचा ठराव मंजूर केला आहे असे पक्षांतर्गत निवडणूक समितीने स्पष्ट केले आहे.
तर बाळा नांदगावकर यांनीही यासंदर्भातील माहिती दिली असून ते म्हणाले की,आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची पक्षांतर्गत निवडणूक झाली व या पक्षाचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरेंची नेमणूक करावी असा ठराव मी बाळा नांदगावकर यांनी मांडला याला नितीन सरदेसाई यांनी अनुमोदन दिले व एकमताने राज ठाकरेंची नेमणूक झाली आहे.त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.