राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही लोकसभेच्या निकालानंतर भाष्य करतांना भाजपाला अप्रत्यक्ष खडे बोल सुनावले होते.“लोकशाहीत निवडणूक ही अनिवार्य प्रक्रिया आहे यात दोन पक्ष असल्याने स्पर्धा राहायला हवी मात्र हे युद्ध नाही.प्रचारादरम्यान ज्या पद्धतीने टीका झाली त्यातून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.आता निवडणुका आटोपल्या असून ‘एनडीए’चे सरकार स्थापन झाले आहे.निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला त्यापासून दूर होत समस्यांवर चर्चा व्हायला हवी त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सहमतीच्या राजकारणावर लक्ष द्यायला हवे” अशी अपेक्षा सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केली होती.मोहन भागवत पुढे म्हणाले,“एक खरा सेवक काम करतांना शिष्टाचार राखतो.शिष्टाचार राखतांना तो अविचल राहतो.‘मी हे केले ते केले’ असा कोणताही श्रेयवाद करत नाही.सेवक कधीच अहंकार दाखवत नाही.तो नेहमी शिष्टाचार पाळतो.फक्त अशा व्यक्तीलाच सेवक म्हणण्याचा अधिकार आहे.” असेही खडेबोल मोहन भागवत यांनी सुनावले होते.