दरम्यान नवनीत राणा यांना यावेळी विचारण्यात आले की तुम्ही आता राज्यसभेवर जाणार आहात की महाराष्ट्रात काम करणार ? यावर त्या म्हणाल्या,मी माझ्या मतदारसंघात,माझ्या लोकांसाठी काम केले त्यामुळेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीकरांनी मला अपक्ष उमेदवार म्हणून निवडून संसदेत पाठवले त्यानंतर खासदार झाल्यानंतर मी अजून कामे केली.परंतु मला कळत नाही की माझ्या जनतेने मला का थांबवले ? मी सध्या भविष्याचा विचार करत नाही.मी एक कार्यकर्ती म्हणून आमच्या जिल्ह्यात माझ्या मतदारसंघात काम करत राहीन. आमच्या नेत्यांबरोबर बोलून पुढची वाटचाल कशी करायची याची तयारी करेन.नवनीत राणांच्या पराभवाला भाजपा जबाबदार असल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे.यावरून राणा यांना प्रश्न विचारण्यात आला की,लोकसभा निवडणुकीत तुम्हाला जनतेने,कार्यकर्त्यांनी की महायुतीच्या नेत्यांनी थांबवले ? यावर नवनीत राणा म्हणाल्या,मी २०१९ पासून आतापर्यंत खूप इमानदारीने जनतेसाठी काम केले आहे.पक्षाची एक कार्यकर्ती म्हणून जी कामे करायला हवी होती ती सगळी कामे केली.आम्ही खूप लढलो.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने मार्गक्रमण करत राहिलो. शिवाजी महाराजांचे एक वाक्य आहे की लढणारा कधीच मागे वळून पाहत नाही त्याप्रमाणे मी देखील आता मागे वळून पाहणार नाही.पुढेच चालत राहीन असेही नवनीत राणा यांनी नमूद केले आहे.