मिळालेल्या माहितीनुसार सरसंघचालकांनी शाखांची संख्या वाढवण्यावर आणि विस्तारवादावर जोर दिला आहे.संघाचे काम काय ते लोकांपर्यंत पोहचवण्यासही सांगण्यात आले आहे.लोकसभेत भाजपा आणि एनडीएने ४०० पारचा नारा दिला होता त्यापैकी ३७० जागा आपण आपल्या बळावर जिंकू असेही भाजपाने म्हटले होते.प्रत्यक्षात भाजपाला २५० ही संख्याही स्वबळावर गाठता आलेली नाही.या सगळ्या दिवसानंतर सरसंघचालक आणि संघाच्या इतर नेत्यांची वक्तव्य समोर येत आहेत.सातत्याने भाजपाला पराभवावरुन ऐकवले जात आहे.आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांनी लोकसभा निवडणूक निकालानंतर एक लेख लिहून भाजपाला अहंकारी म्हटले आहे.तर इंडिया आघाडीला राम विरोधी म्हटले आहे.ज्यांनी रामाची भक्ती केली त्यांच्यात हळूहळू अहंकार आला तरीही लोकांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून त्यांना निवडले तर ज्यांनी रामाला विरोध केला ते रामविरोधी आहेत असेही त्यांनी म्हटले होते या सगळ्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.