‘जय मातृभूमी जीवनभर निस दिन तेरेही गुण गाये पर तेरा पार नहीं पाये’ असे एक गाण आहे.समाजाच्या आतमध्ये काय सुरु असते ते कळत नाही.निवडणुकांमधले पक्ष बदलतात पण राज्यकर्त्यांची संस्कृती बदलत नाही.सामुदायिक शहाणपण आणि तसेच वेडेपण असे सगळे चाललेले आहे.आपल्याकडचे सगळे राजकीय पक्ष वाद आधी उकरुन काढायचा आणि समाजाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत तिथे दुर्लक्ष करायचं हे सातत्याने झाले आहे.प्रत्येक सरकार गरिबांचेच कसे असते ? इंदिरा गांधींनी गरीबी हटाव म्हटले होते त्या घोषणेला किती वर्षे झाली ? प्रत्येक सरकार तेच म्हणते.प्रत्यक्ष जीवनाचा दर्जा काय ? तो समपातळीवर यायला पाहिजे.एकीकडे उद्या आत्महत्या करु का ? अशा विचारात शेतकरी आहेत.दुसरीकडे जगातल्या श्रीमंत घराण्यांपैकी १०-१२ घराणी आहेत हे चित्र बदलावेच लागेल.बर हे आजच नाही.अर्थव्यवस्थेत भांडवलशाहीला मोकाट सोडणे हे नेहरुंच्या काळापासून सुरु आहे त्यावेळी टाटा-बिर्ला होते आता नाव बदलले आहे.आर्थिक विषमता मिटवणे  जास्त गरजेचे आहे असेही विनय हर्डीकर यांनी म्हटले आहे.आम्हाला सत्ता द्या,आम्ही प्रश्न सोडवू.दर पाच वर्षांनी हेच म्हणतात.आता काय म्हटले जात आहे ? की आम्ही कामे सुरु केली आहेत ती पूर्ण करायला आम्हाला सत्ता द्या.प्रश्न तुम्ही किती काळ आहात असे नाही.१० वर्षात सगळ्यांची सोय लावायला गेलात.विचारधारांप्रमाणे राजकारण चालत नाही तसेच योजनाही आखल्या जाऊ शकत नाहीत.भारतीय समाजाचे  वैशिष्ट्य असे आहे कितीही आदर्श यंत्रणा उभारा आपले लोक त्याची महिनाभरात वाट लावून दाखवू शकतात.जर्मनीतला आणि आपल्याकडे हा फरक आहे.जर्मनीत एकदा निर्णय झाला की देश मान्य करतो.इथे तसे नाही ही वस्तुस्थिती आहे असेही विनय हर्डीकर यांनी थिंक बँकला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.