हजसाठी मक्का शहरात आलेल्या ५५० भाविकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे तर दोन हजाराहून अधिक भाविकांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत.मृतांची संख्या वाढू शकते असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.हज यात्रेकरून रांगेत उभे असतांना सतत डोक्यावर पाणी ओतून घेत असल्याचे चित्र सोमवारी पहायला मिळाले.यात्रेकरूंना उन्हाचा कमीत कमी त्रास व्हावा यासाठी तिथले वॉलेन्टियर्स लोकांना पाणी,कोल्ड ड्रिंक्स,आईसक्रिम वाटत होते.हज व्यवस्थापन समितीने भाविकांना छत्रीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच जास्तीत जास्त पाणी प्या,दुपारच्या वेळी बाहेर पडू नका अशा सूचना देखील दिल्या आहेत.शनिवारी माऊंट अराफात येथे प्रार्थना आणि अनेक हज विधींसाठी यात्रेकरुंना दुपारच्या उन्हात थांबावे लागले होते व अनेक भाविक तासनतास तिथे उभे होते त्यामुळे अनेकांची प्रकृती खालावली होती असे हज व्यवस्थापन समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.