ज्योती लक्ष्मण जाधव (प्राथमिक शिक्षिका)
पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ जुलै २४ शुक्रवार
ज्ञानरचनावाद
“करील मनोरंजन जो मूलांचे,जडेल नाते प्रभुशी तयाचे” या साने गुरुजीच्या ओळी आहेत.या ओळी प्रत्येक मुलांना अध्ययन अनुभव देतांना आपण आमलात आणल्या पाहिजे असे जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा नक्कीच मूले स्वयंअध्ययनास तसेच आनंददायी शिक्षण घेण्यास प्रेरित होईल असे मला वाटते.यासाठी मी ज्ञानरचनवाद संकल्पना अध्ययन अध्यापनात अंमलात आणण्याचा विचार केला.त्यासाठी मी मूलांना प्रत्यक्ष कृती करून व अनुभव मूलाना देण्याचा प्रयत्न केला.गटामध्ये अध्ययन तसेच चर्चेतून मूले अगदी आनंदाने अध्ययन करतात असे मला वाटते.
चित्रकार्ड देऊन वर्णन करणे,बेरीज-वजाबाकी,आगगाड्याद्वारे शाब्दिक उदा.सोडविणे अशा अनेक कृतीतून मूल अगदी आनंदाने शिकू शकते हा माझा अनुभव आहे.अशाप्रकारे
१) ज्ञानरचनावादामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आनंददायी व मनोरंजक बनते.
२) बुध्दी,भावना व कृती यांचा समन्वय साधला जातो.
३) शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता वाढीस मदत होते.
सौ.ज्योती लक्ष्मण जाधव (प्राथमिक शिक्षिका)
जि.प.प्रा.शाळा काळाडोड,ता.यावल जि.जळगाव