यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जुलै २४ रविवार
तालुक्यातील फैजपूर येथील अवधूत सांप्रदायाच्या वतीने आज दि.२१ जुलै रविवार रोजी गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून फैजपूर ते श्रीक्षेत्र डोंगरदा या तीर्थ क्षेत्रापर्यंत पायी दिंडीचे जल्लोषात मार्गक्रमण करण्यात आले.सदरील पायी दिंडी सोहळा हा दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आला असून या दिंडीत लहान थोरांपासून १२५ ते १५० भाविक भक्त सहभागी झाले आहेत.सदर दिंडीने डोंगर कठोरा येथून पुढे श्रीक्षेत्र डोंगरदा येथे जाण्यासाठी जोरदार व मोठ्या जल्लोषात मार्गक्रमण केले आहे.
सदरील दिंडी सोहळ्यात दिंडी मार्गदर्शक अतुल केशव होले,तुकाराम बोरोले,रामा होले,जितेंद्र होले,नीलकंठ चौधरी,सचिन नारखेडे,वासुदेव चौधरी,शिल्पा होले,अनिल कोल्हे,गणेश होले,लोकेश वाघुळदे,तनय होले,भाग्येश होले,कल्याणी होले,ज्योती होले,मीनाक्षी होले,सीमा बोरोले, जयश्री चौधरी,दामिनी चौधरी,ललिता चौधरी,यमुना चौधरी,माधुरी चौधरी,खेमचंद्र तांबर,रिया बेंडाळे,देवेंद्र बेंडाळे यांच्यासह अवधूत भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.