यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जुलै २४ रविवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील पंचवटी श्री विठ्ठल मंदिर हरीभक्त भाविक भक्तांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही आज दि.२१ जुलै रविवार रोजी गुरु व्यास पौर्णिमेनिमित्ताने श्री विठ्ठल मंदिर पंचवटी मारोती मंदिरापासून व्यास नगरी यावल पर्यंत पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.यानिमित्ताने सदर दिंडी मार्गक्रमण करीत असतांना सातोद या गावात ह.भ.प.हेमंत देविदास पाटील यांच्या वतीने दिंडी सोहळ्यात सहभागी भाविक भक्तांना चहा व पोहे नाश्ता तसेच ह.भ.प.पंडित पाटील यांच्या वतीने जेवणाचा लाभ देण्यात आला.
सदर दिंडी सोहळ्यात दिंडी चालक ह.भ.प.रवींद्र पाटील,ह.भ.प.दिनकर महाराज,ह.भ.प.दत्तात्रय गुरव,ह.भ.प.दिनकर पाटील,अशोक गाजरे,शालिक झोपे,सुरेश भिरूड,संजय पाटील,राहुल आढाळे,सुरेश कळसकर,श्रीपाद आमोदे यांच्यासह महिला पुरुष व बाळगोपाळ हरिभक्त बहुसंख्येने उपस्थित होते.