Just another WordPress site

मनवेल आश्रमशाळेत चक्कर येवुन विद्यार्थ्यांचा दुदैवी मृत्यु !! प्रकल्प अधिकाऱ्यांची शाळेला भेट व कारवाईचे आदेश !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-

दि .६ ऑगस्ट २४ मंगळवार

तालुक्यातील मनवेल येथील आदिवासी आश्रम शाळेतील ९ वर्षाच्या विद्यार्थ्याचा शाळेत अचानक चक्कर येवुन पडल्याने दुदैवी मृत्यु झाल्याची घटना नुकतीच घडली असुन सदर घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी आपला नियोजित दौरा रद्द करून तात्काळ आश्रमशाळेला भेट देवुन संपुर्ण परिस्थितीचा आढावा घेतला व शाळा प्रशासनाला काही सुचना दिल्या आहे.दरम्यान सदरील विद्यार्थ्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी दिले आहेत.

याबाबत अधिक माहीती अशी की,तालुक्यातील मनवेल येथील अनुदानित आश्रमशाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणारा ९ वर्षाचा फुलसिंग पहाडसिंग बारेला राहणार विटवे पाडा (हिंगोणा) तालुका यावल या विद्यार्थ्यास काल दि .५ ऑगस्ट सोमवार रोजी सकाळच्या सुमारास शाळेत अचानक चक्कर येवुन पडला.सदर विद्यार्थ्यास शाळा प्रशासनाच्या वतीने तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉ.प्रशांत जावळे यांनी त्या विद्यार्थ्याची तपासणी करीत त्यास मृत घोषीत केले.सदर घटनेची माहिती शाळा प्रशासनाच्या वतीने तात्काळ त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आल्यावर त्यांनी यावल ग्रामीण रुग्णालय गाठले.यावेळी रूग्णालयात उपस्थित मनसेचे संजय नन्नवरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जुगल पाटील व त्यांच्या सहकार्यानी सदरच्या मरण पावलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यु हा निष्काळजी पणामुळे झाल्याचा आरोप केला आहे.दरम्यान आदिवासी प्रकल्प अधिकारी अरूण पवार व सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य  ठेवुन तात्काळ सखोल चौकशी करण्यात येईल असे संबंधितांना आश्वासित केले.दरम्यान काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीवरून सदर विद्यार्थ्यांचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन न करता मयत फुलसिंग बारेलाचा मृतदेह जळगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

प्रसंगी आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तात्काळ आरोग्य तपासणी करण्यात यावी असे आदेश दिल्यावर प्रकल्प अधिकारी अरूण पवार व सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण विभाग पवन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजु तडवी यांच्या पथकाच्या वतीने तात्काळ मनवेल शाळेत जावुन संपुर्ण विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी  करण्यात आली.यावेळी प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधुन त्यांच्या दैनदिन शाळेत शिक्षण घेतांना येणाऱ्या समस्या व अडचणी जाणुन घेतल्या व आश्रमशाळेच्या प्रशासनाने या अडचणी तात्काळ सोडवाव्यात असे सुचित केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.