यावल – पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि .९ ऑगस्ट २४ शुक्रवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये आज दि.९ ऑगस्ट शुक्रवार रोजी जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नितीन झांबरे हे होते.कार्यक्रमाची सुरुवात शहीद भगतसिंग व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ-विद्यार्थिनींनी सामूहिक व वैयक्तिक नृत्य सादर करून अनेकांची मने जिंकली.दरम्यान वर्षभरात विविध गुणदर्शनावर आधारित कार्यक्रम सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुण सादरीकरणा नुसार त्यांना शाळेच्या वतीने प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येते.त्यानुसार या कार्यक्रमात आकर्षक कार्यक्रम सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार असल्याची भावना मुख्याध्यापक नितीन झांबरे यांनी व्यक्त केली.तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या कुवतीनुसार फारच आकर्षक अशा कार्यक्रमाचे सादरीकरण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम आढाळे या विद्यार्थिनीने केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार हिमांशी झांबरे हिने मानले.यावेळी मुख्याध्यापक नितीन झांबरे,नंदन वळींकर,रामेश्वर जानकर,आर.पी. चिमणकारे,पी.पी.कुयटे,सचिन भंगाळे,चेतन चौधरी,विवेक कुलट,सोनाली फेगडे,शुभांगीनी पाटील,मोहिनी पाटील,संदीप बाविस्कर यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.