यात्रेदरम्यान भाविक भक्तांचे सामूहिक फोटो शूट

जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये दुर्घटना झाल्याने २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील मदत व पुनर्वसन विभागातील अधिकारी,केंद्रीय अधिकारी यांच्याशी संवाद साधत मदतीच्या कामाची माहिती घेतली.मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधून भाविकांचे मृतदेह महाराष्ट्रात तातडीने आणण्याकरिता विनंती केली होती.याप्रकरणी राज्याला सर्वतोपरी मदत करू व त्यासाठी समन्वयासाठी विशेष अधिकारी नियुक्त केल्याचेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद वायुसेनेचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.उद्या हे मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे आणण्यात येतील व तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपविण्यात येणार आहेत.