ही घटना खरी खगोलीय घटना नव्हती तर रुग्णालयाच्या खिडकीच्या काचेतून प्रकाशाच्या अपवर्तनामुळे( light refracting) झालेला एक ऑप्टिकल इल्यूजन (optical illusion) होता.व्हिडीओमध्ये दिसणारे सात सूर्य हे काचेच्या प्रत्येक पटलाने तयार केलेल्या आभासी प्रतिमा होत्या.सोशल मीडिया वापरकर्त्यांनी,विशेषत: चीनी प्लॅटफॉर्म Weibo वर विनोदीपणे ऑप्टिकल युक्तीच्या कारणाचा अंदाज लावला.“आपण शेवटी ग्लोबल वॉर्मिंगबद्दलचे सत्य उघड केले आहे,” एका वापरकर्त्याने खिल्ली उडवली तर दुसऱ्याने विनोद केला,“हे चुंबकीय क्षेत्राच्या त्रुटीमुळे घडले ज्यामुळे समांतर विश्वे दृश्यमानपणे प्रकट झाली.कॉस्मिक ब्युरोने या समस्येचे निराकरण केले आहे आणि जबाबदार असलेल्यांना फटकारले गेले आहे.व्हायरल घटनेने Reddit वर देखील वेगळाच अंदाज बांधत स्वारस्य निर्माण केले.काही वापकर्त्यांनी या घटनेची एका चिनी मिथकाशी तुलना केली,ज्यामध्ये पौराणिक धनुर्धारी Hou Yi ग्रहाला जळण्यापासून रोखण्यासाठी पृथ्वीच्या दहा सूर्यांपैकी नऊ नष्ट करतो.चीनच्या प्रदूषणाच्या समस्यांमुळे हे ““system apocalypse” चे लक्षण आहे की नाही याबद्दल काहींना आश्चर्य वाटले.