यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२७ ऑगस्ट २४ मंगळवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील पंचवटी विठ्ठल मंदिरात काल दि.२६ ऑगस्ट सोमवार रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
यानिमित्ताने पंचवटी विठ्ठल मंदिरात काल दि.२६ ऑगस्ट सोमवार रोजी संध्याकाळी ८ ते रात्री २ वाजेपर्यंत फुगड्या,प्रभुनाम स्मरण,अभंग, कीर्तन,गवळण व पाळणा गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला.तसेच रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी ह.भ.प.रवींद्र पाटील,ह.भ.प.दत्तात्रय गुरव,ह.भ.प.शालिक झोपे,ह.भ.प.दिनकर पाटील,गोपाळ आमोदे,ज्ञानदेव पवार,सुरेश कळसकर,सुपडू कोळी,वैभव कुंभार,राहुल आढाळे यांच्यासह महिला मंडळ,बालगोपाळ व भाविक हरीभक्त बहुसंख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमात टाळ मृदूंगाच्या ठेक्यावर महिला व पुरुष मंडळींनी गरबा,फुगडी आणि पावली खेळून मनसोक्त आनंद लुटला.