यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ ऑगस्ट २४ बुधवार
शहरातील विस्तारित भागात असलेल्या गंगेश्वर महादेव मंदिरात भाविकांच्या वतीने काल दि.२७ ऑगस्ट रविवार रोजी कावड यात्रा काढण्यात आली.तापीनदी पात्रातून पुजाअर्चा झाल्यानंतर पवित्र जल घेऊन अंजाळे येथील श्री अर्जुनेश्वर महादेव मंदिरापासून ते यावल येथील गंगेश्वर महादेवपर्यंत ही कावड पदयात्रा काढण्यात आली.दरम्यान महाजलाभिषेक केल्यानंतर महाआरती व भाविक,भक्तांमध्ये प्रसाद वितरण अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शहरातील विस्तारित भागात भुसावळ रस्त्यावर असलेल्या गंगानगर परिसरातील श्री गंगेश्वर महादेव मंदिर येथे भाविक भक्तांच्यावतीने काल दि.२७ ऑगस्ट रविवार रोजी भव्य कावड पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.सदरील कावड यात्रा समितीचे अध्यक्ष सुनील गावडे,तुळशीराम माळी,रितेश बारी,अनिल गावडे,अनिकेत सरोटे,सागर चौधरी,ज्ञानेश्वर वरुडकर,रोहित वारके,योगिता लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली.सदर कावड यात्रेत महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग राहिला हे विशेष !.दरम्यान कावड यात्रा अंजाळे गावाजवळील तापीनदीच्या पात्रापासून पवित्र जल घेऊन अंजाळे येथील श्रीअर्जुनेश्वर महादेव मंदिरापासून ते थेट यावल शहरातील गंगानगरपर्यंत ही कावड यात्रा काढण्यात आली.सवाद्य निघालेली ही कावड यात्रा शहरात दुपारी दाखल झाली त्यावेळी येथील महादेव मंदिरात महादेवांचा जलाभिषेक करण्यात आला व त्यानंतर आरती पार पडली व भाविक,भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.सदरहू सदरील कावड यात्रा बालगोपाल,महिला व पुरुष यांच्या सहभागातून मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा प्रवक्ते व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ.कुंदन फेगडे,प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपला सहभाग नोंदविला.