याबाबतची संगणक प्रणाली विकसित झाली असून याबाबत चाचणी घेण्याचे काम सुरू असून १ ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे भाविकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने पूजा नोंद करता येईल असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले आहे.श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील श्री संत नामदेव पायरीच्या दरवाजाला नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील भाविक चांदी बसवून देणार आहेत.शंकर दिगंबर अरगुलवार व नरसिमलू दिगंबर अरगुलवार हे दिगंबर तुकाराम अरगुलवार आणि जनाबाई दिगंबर अरगुलवार यांच्या स्मरणार्थ हे काम करून देणार आहेत त्यासाठी सुमारे ३० किलो चांदीचा वापर करण्यात येणार आहे.बाजार मूल्यानुसार सुमारे २६ लक्ष इतकी त्याची किंमत होत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.