यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ सप्टेंबर २४ गुरुवार
येथील शहरातील २१ श्रीगणेश मंडळाच्या वतीने पाच दिवसाच्या श्रीगणेशाचे काल दि.११ सप्टेंबर बुधवार रोजी मोठया उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात सवाद्य निरोप देण्यात आला व याचबरोबर गणेश उत्सवाची सांगता झाली.
दरम्यान यावल शहरातुन दुपारी २ वाजेनंतर काढण्यात आलेली श्री विसर्जन मिरवणुक ही शहरातील महाजन गल्ली,म्हसोबा मार्ग,काजीपुरा मस्जिद,चावडी मार्गाने होत कोर्ट रोड मार्गाने काढण्यात आली.सदर श्री विर्सजन रात्री उशिरा १२ वाजेपर्यंत श्री व्यास मंदीराजवळ उभारण्यात आलेल्या कुंडात तर काही मंडळांनी तापी नदीवर करण्यात आले.यावेळी प्रांतधिकारी बबनराव काकडे,यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर,निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते,मंडळ अधिकारी मिना तडवी व त्यांचे कर्मचारी,फैजपुर विभाग डीवायएसपी अन्नपुर्णा सिंग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या दोन पोलीस निरिक्षक व सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान गोरे,पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे यांच्यासह तिन पोलीस उपनिरिक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी,दंगा नियंत्रण पथक,राज्य राखीव पोलीस दल,शीघ्र कृती दल पथक,गृहरक्षक दलाचे महिला व पुरुष कर्मचारी अशा तीनशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शांतता राखण्याकामी आपला बंदोबस्त चोख पाळला.दरम्यान शांतता समितीचे सदस्य हाजी शब्बीर खान,विजय सराफ,गोपाळसिंग पाटील,हाजी गफ्फार शाह,हाजी ईकबाल खान,उमेश फेगडे,प्रा.मुकेश येवले,राहूल बारी,पंकज सोनार,तुषार उर्फ मुन्ना पाटील (शिवसेना शिंदे गट) जिल्हा उपप्रमुख,डॉ.निलेश गडे,सैय्यद युनुस सैय्यद युसुफ,हाजी गुलाम रसुल मेंबर,समीर शेख मोमीन,हेमराज फेगडे,जगदीश कवडीवाले,संतोष धोबी,योगेश चौधरी,कदीर खान,मनोहर सोनवणे,अनिल जंजाळे,हाजी अय्याज खान यांच्यासह सर्व सदस्यांचे मोठे सहकार्य मिळाले.
कोरपावली महेलखेडी व सावखेडासिम येथे पाच दिवसाच्या श्रीगणेशाला दिला निरोप
तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील महेलखेडी,कोरपावली आणी सावखेडासिम येथे पाच दिवसाच्या पाच गणेश मंडळाच्या वतीने लाडक्या गणरायाला भक्तिमय वातावरणात व जल्लोषात निरोप देण्यात आला.दरम्यान महेलखेडी कोरपावली व सावखेडा सिम येथील गणेश मंडळांनी पाच दिवसाचा गणेशोत्सव उत्साहात पार पाडून शांतता व उत्साहाच्या वातावरणात श्रीविसर्जन करण्यात आले.
तालुक्यातील कोरपावली येथे दोन गणेश मंडळ महलखेडी येथे एक आणि सावखेडा येथे एक आणि एक खाजगी अशा मंडळांनी गणरायाची स्थापना करण्यात आली होती.गणेश उत्सवाच्या पाच दिवस गणेश मंडळाच्या वतीने विविध समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेत हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला व पाचव्या दिवशी ढोल ताशांच्या व डीजेच्या वाद्यात भव्य मिरवणूक काढत गणरायाला निरोप देण्यात आला.उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी दहीगावचे हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पवार,होमगार्ड जनार्दन महाजन,याकुब तडवी,सिताराम बारेला व पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.सावखेडा सीम येथे हवालदार वसिम तडवी,होमगार्ड बंधू आणि पोलीस पाटील पंकज बडगुजर,लक्ष्मण बडगुजर विलास पाटील,शेखर पाटील,उपसरपंच मुबारक सुभेदार तडवी यांचेसह गावातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.