Just another WordPress site

सातारा येथील पंचकर्म केंद्रात बीड जिल्ह्यातील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सातारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
सातारा येथील यवतेश्वर येथे असलेल्या आयुर्वेदिक केंद्रात परजिल्ह्यातील ५५ वर्षीय महिलेचा नुकताच मृत्यू झाला आहे.पंचकर्म केल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.शैलजा चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,सातारा शहरापासून कास रोडला यवतेश्वर येथे एक प्रसिध्द पंचकर्म केंद्र आहे.येथे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील लोक पंचकर्म उपचारासाठी येत असतात.निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या पंचकर्म केंद्रात बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील महिला पंचकर्म करण्यासाठी आलेल्या होत्या यावेळी सदरील महिलेसोबत तिचे पती सोबत होते.महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.घटनेची सातारा  पोलिसांनी दखल घेतली असून पुढील तपास वेगाने सुरु आहे.महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला याबाबत अधिक माहिती मिळून आली नाही.परंतु तपास योग्य दिशेने करण्यात पोलिसांना यश येईल असे सातारा पोलिसांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.