Just another WordPress site

यावल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्वच्छता अभियान

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह.समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमा अंतर्गत महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता राखण्याची शपथ घेऊन बोटॅनिकल गार्डन येथे स्वयंस्फूर्तिने स्वच्छतेचे कार्य केले.

या स्वच्छता कार्यक्रमाला २९ महाविद्यालयीन विद्यार्थीनी व विद्यार्थी स्वयंसेवक म्हणुन उपस्थित होते.सदर राष्ट्रीय सेवा योजना २४ स्वच्छता सेवा कार्यक्रम १७ सप्टेंबर ते ३ आक्टोबर या कालावधीत राबविला जाणार आहे.सदर कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.पी.व्ही.पावरा व महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.वैशाली कोष्टी यांच्या सहभागाने विद्यार्थ्यानी यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम व प्रयत्न केले.सदरहू विद्यार्थ्यांनी राबविल्या या स्वच्छता कार्यक्रमाचे महाविद्यालयातील गुरूजनांनी विशेष कौत्तुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.