सध्या जी दीक्षाभूमी आपल्याला बघायला मिळत आहे त्याचे भूमिपूजन जागतिक बौद्ध परिषदेचे अध्यक्ष भदंत आलबर्ट एडिरेसिंगे (श्रीलंका) यांच्या हस्ते २७ जून १९७८ ला झाले.स्तुप साकारण्यासाठी तीन कोटींचा बजेट तयार केला गेला.१२० फुटांच्या स्तुपाचे शिल्पकार शिवदानमल मोखा आहेत.सांची स्तुपाच्या आधारे दीक्षाभूमी स्तुप साकारण्यात आले आहे.२००१ साली तत्कालीन राष्ट्रपती के.आर.नारायण यांच्या हस्ते दीक्षाभूमी स्तुपाचे उद्घाटन केले गेले.दरवर्षी दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची संख्या वाढत असल्यामुळे सध्या दीक्षाभूमीचा पुनर्विकास आराखडा तयार केला आहे.आराखडयानुसार दीक्षाभूमीचा सर्वांगिण विकास करण्याचा दावा राज्य शासन करत आहे त्यामुळे येत्या काळात दीक्षाभूमी परिसर आणखी भव्य स्वरुपात बघायला मिळण्याची शक्यता आहे.