डेमोक्रॅटिक पक्षातर्फे या निवडणुकीत हॅरिस यांच्या रूपाने दुसऱ्यांदा महिला उमेदवारास संधी देण्यात आली पण २०१६ मध्ये हिलरी क्लिंटन यांच्याप्रमाणेच यंदाही अमेरिकेच्या अध्यक्षपदी महिला निवडून येण्याची संधी हुकली.ट्रम्प यांचा प्रचंड जनाधार आजही अबाधित असल्याचे या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले.६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकी काँग्रेसच्या कॅपिटॉल इमारतीवरील हल्ल्यास चिथावणी देऊन त्यांनी जनमताचा कौल उधळण्याचा आणि देशाची घटनात्मक प्रतीके उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता व त्यांच्याविरोधात चार खटले सुरू आहेत पण या कशाचाही परिणाम त्यांच्या मतदारांवर झाला नाही.सलग तीन निवडणुकांमध्ये ट्रम्प लढले व त्यांतील दोन त्यांनी जिंकून दाखवल्या.दुसऱ्या प्रयत्नात ते अमेरिकेचे सर्वांत वयोवृद्ध अध्यक्ष म्हणून निवडून आले.यंदाच्या त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ प्रातिनिधिक मते नव्हे तर प्रत्यक्ष मतेही त्यांना हॅरिस यांच्यापेक्षा अधिक मिळाली.२००४ नंतर प्रथमच अशा प्रकारे रिपब्लिकन उमेदवाराला डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्ध्यापेक्षा अधिक मते मिळाली आहेत.ट्रम्प यांच्या निवडीमुळे अमेरिकेचे परराष्ट्र धोरण,आर्थिक धोरण यांतील संभाव्य बदलांची आणि त्यांतील धोक्यांची चर्चा सुरू झाली आहे.ट्रम्प आणि त्यांचे समर्थक यांना अर्थातच याची फिकीर सध्या तरी वाटत नाही.अभूतपूर्व आनंद साजरा करण्यातच त्यांनी संध्याकाळ व्यतीत केली.पराभूत उमेदवार कमला हॅरिस या बुधवारी समर्थकांसमोर आल्याच नाहीत त्या लवकरच समर्थकांशी संवाद साधतील असे सांगण्यात आले.

हॅरिस यांच्या विरोधात

● गर्भपात,लोकशाहीविषयी थंड जनमत

● स्थलांतरितांबाबत प्रतिवादाचा अभाव

● महिलांकडून पुरेसे मतदान नाही

● मुस्लीम मतदारांचा रोष

ट्रम्प यांच्या पथ्यावर

● स्थलांतरितविरोधी प्रचार

● रूढीवादी गोरे मतदार

● हल्ल्यातून बचावल्याने सहानुभूती

● अर्थव्यवस्थेविषयी प्रचार

● लॅटिनो,आफ्रिकन नवमतदार

● ट्रम्प यांच्याकडून मतदारांचे आभार

● ‘अमेरिका प्रथम’ धोरणाचा भारतीय व्यापाराला फटका ?

● ट्रम्प यांच्यावरील खटल्यांचे काय ?

● अमेरिकेच्या राजकीय इतिहासात प्रथमच…

● दुसऱ्या कार्यकाळातील धोरणांवर लक्ष

● पर्यावरणवादी चिंतेत

● जगभरातील नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

अमेरिकेचा सुवर्णकाळ आता परत येणार असून देशाच्या ‘जखमा’ मी भरणार आहे.अमेरिकेला पुन्हा महान बनविण्यासाठी झालेला हा शानदार विजय आहे.अनेकांनी मला सांगितले की देवाने मला एका कारणासाठी वाचविले आहे ते कारण म्हणजे देशाला वाचविणे,पुन्हा महान बनविणे…आता आपण हे उद्दिष्ट एकत्रितपणे साध्य करूया असे डोनाल्ड ट्रम्प नियोजित अध्यक्ष अमेरिका यांनी म्हटले आहे.तर सदरील ऐतिहासिक निवडणूक विजयाबद्दल माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे मन:पूर्वक अभिनंदन. भारत-अमेरिका सर्वंकष जागतिक आणि सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी नव्याने सहकार्यासाठी मी उत्सुक आहे.एकत्रितरीत्या आपण आपल्या जनतेच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता,स्थैर्य व भरभराटीला चालना देण्यासाठी काम करूया अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.