न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट,यूएस ॲटर्नी कार्यालयाने यासंबंधी एक प्रसिद्धी पत्रक काढले आहे.यूएस अतिरिक्त सहायक ॲटर्नी जनरल लिसा एच मिलर यांनी सांगितले, “भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची लाच देणे,गुंतवणूकदार आणि बँकाँशी खोटे बोलणे आणि अब्जावधी रुपये त्यातून गोळा करण्याचा आरोप गौतम अदाणी आणि इतरांवर ठेवण्यात आला आहे.”

“आम्ही २३ तारखेलाच संध्याकाळी सत्तास्थापनेचा दावा करू शकतो.महाविकास आघाडीच्या १६० ते १६५ जागा निवडून येत आहेत त्यामुळे या एक्झिट पोल्सवर विश्वास ठेवू नये हे शिंदे आणि फडणवीसांचे षडयंत्र आहे.सत्तास्थापनेइतके बहुमत मिळणार असून २३ तारखेला सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत आमचा मुख्यमंत्री कोण असणार हे सांगणार असेही संजय राऊत म्हणाले.