प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट केली आहे ते म्हणाले “जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ.” तसेच “आम्ही सत्ता निवडू ! आम्ही सत्तेत राहायला निवडू !” असेही ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळण्याची चिन्हे नाहीत.निकालानंतर राजकीय खिचडी होण्याची शक्यता आहे.राज्यात प्रादेशिक पक्ष निर्णायक भूमिकेत राहणार आहेत असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले होते.महाराष्ट्रातील २८८ जागांपैकी किमान १०० जागा राष्ट्रवादीचे शरद पवार गट,अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाकडे जातील तर उर्वरित १८८ जागांमध्ये भाजप,काँग्रेस,शिवसेना उध्दव ठाकरे गट व इतर पक्षांचा समावेश राहील.सरकार स्थापनेसाठी कुठल्याही एका पक्षाला बहुमता एवढ्या जागा मिळणार नाहीत त्यामुळे राष्ट्रीय पक्षांना सत्तास्थापनेसाठी प्रादेशिक पक्षांवर अवलंबून रहावे लागेल.भाजप व काँग्रेसला बाहेर ठेऊन इतर पक्षांनी एकत्रित येत महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्याचा प्रयोग देखील होऊ शकतो त्यामध्ये जुळवाजुळव करण्यात खासदार सुप्रिया सुळेंची भूमिका महत्त्वाची असेल असे ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.