“विरोधी पक्षांच्या माध्यमातून ईव्हीएमच्या विरुद्ध जन आंदोलन उभारणार” !! विधानसभेतील अपयशानंतर ‘मविआ’ मोठा निर्णय !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ नोव्हेंबर २४ मंगळवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडले व त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.या निकालात महायुतीला मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला कारण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष,शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश आले तसेच महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होईल त्याबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत.मात्र असे असले तरी विधानसभेच्या निकालाबाबत आता अनेक नेत्यांकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत विरोधी पक्षांच्या माध्यमातून ईव्हीएमच्या विरुद्ध जन आंदोलन उभारणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.ईव्हीएमबाबत काही जणांनी उदाहरणासह दाखवले आहे की १३८ ते १३८ आणि पुढे काही वाढवले म्हणजे एक पॅटर्न फिक्स केलेला आहे आणि त्या पॅटर्ननुसार मतदान झाले.आता काही जणांचे मतदारसंघ बालेकिल्ले समजले जातात मग त्या बालेकिल्ल्यातच मतदानात फेरफार झाली.मी हे आज बोलत नाही,आज शरद पवार यांनाही मी सांगितले की आपल्याला ईव्हीएमविरोधात लढावे लागेल अन्यथा ईव्हीएम आपल्याला रशियाकडे घेऊन जाईन जसे पुतिनने आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपवून टाकले तसे आपल्याकडेही होऊ शकते असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.