Police Nayak
Just another WordPress site
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Tuesday, June 16, 2026

Police Nayak Police Nayak - Just another WordPress site

  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Police Nayak

“विरोधी पक्षांच्या माध्यमातून ईव्हीएमच्या विरुद्ध जन आंदोलन उभारणार” !! विधानसभेतील अपयशानंतर ‘मविआ’ मोठा निर्णय !!

राजकीयमहाराष्ट्र घडामोडी विशेष
By टीम पोलीस नायक Last updated Nov 26, 2024 0

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२६ नोव्हेंबर २४ मंगळवार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडले व त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.या निकालात महायुतीला मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला कारण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष,शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश आले तसेच महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होईल त्याबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत.मात्र असे असले तरी विधानसभेच्या निकालाबाबत आता अनेक नेत्यांकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत विरोधी पक्षांच्या माध्यमातून ईव्हीएमच्या विरुद्ध जन आंदोलन उभारणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.ईव्हीएमबाबत काही जणांनी उदाहरणासह दाखवले आहे की १३८ ते १३८ आणि पुढे काही वाढवले म्हणजे एक पॅटर्न फिक्स केलेला आहे आणि त्या पॅटर्ननुसार मतदान झाले.आता काही जणांचे मतदारसंघ बालेकिल्ले समजले जातात मग त्या बालेकिल्ल्यातच मतदानात फेरफार झाली.मी हे आज बोलत नाही,आज शरद पवार यांनाही मी सांगितले की आपल्याला ईव्हीएमविरोधात लढावे लागेल अन्यथा ईव्हीएम आपल्याला रशियाकडे घेऊन जाईन जसे पुतिनने आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपवून टाकले तसे आपल्याकडेही होऊ शकते असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

आपल्याकडे एखादे प्रकरण लोकांना समजून सांगावे लागते तसे आम्हालाही याबाबत करावे लागेल.विरोधकांना व्यवस्थितरित्या संपवून टाकायचे हा प्लॅन दिसत आहे. आता चार महिन्यांपूर्वी दोन लाख ४० हजार मतांनी चंद्रपूरची जागा निवडून येते आणि आता एक लाखांनी पाठिमागे जाते ? मग एवढे काय घडले ? नांदेडची लोकसभा महाविकास आघाडीला येते पण सर्व विधानसभा तिकडे जातात याचा अर्थ जिल्ह्याजिल्ह्यात पॅटर्न दिला आहे.एवढी मते आणि एवढी मते अशा पद्धतीचा पॅटर्न दिला.मी पहिल्या दिवसांपासून सांगतोय की ईव्हीएमचा विरोध करा असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.एका आमच्या पक्षाची ही गोष्ट नाही.सर्व विरोधी पक्षांना बरोबर घेऊन विश्वासात घेऊन ईव्हीएमच्या विरुद्ध जन आंदोलन उभे करण्याची गरज आहे तसे दिल्लीत शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन झाले होते तशा प्रकारचे आंदोलन उभे करावे  लागणार आहे याबाबतची मानसिक तयारी आमची झाली आहे असेही जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
0
Share
टीम पोलीस नायक

Prev Post

मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेची माघार नाही ? !! शंभूराज देसाई यांची स्पष्टोक्ती

Next Post

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून भाजपा महिला आघाडीने रक्ताने पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र !!

You might also like More from author
महाराष्ट्र घडामोडी विशेष

बँक खाते पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर ८१ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून…

राजकीय घडामोडी विशेष

जळगावमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर !! शिंदे गटाच्या…

महाराष्ट्र घडामोडी विशेष

अखेर रिक्षाचालकांसाठी मराठी सक्ती लांबणीवर !! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी…

महाराष्ट्र घडामोडी विशेष

अनुसूचित जातींचे उपवर्गीकरणाचा भाजपाचा खटाटोप कशासाठी ? समाजात संतप्त भावना तर…

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts

  • जामन्या येथील स्वस्त धान्य दुकानात अनियमितता आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून दुकानाचे निलंबन !!
  • अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाची १७ ठिकाणी धडक कारवाई !! अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांमध्ये घबराट !!
  • “देशात अराजकता माजण्याची शक्यता असून लोक रस्त्यावर उतरतील,अचानक उद्रेक होईल आणि हे सरकार त्या आगीत होरपळून जाईल” !! इंडिया आघाडीच्या बैठकीत संजय राऊत यांनी व्यक्त केले भाकीत !!
  • माळेगाव पोलिसांची दमदार कारवाई !! गावठी पिस्टल,जिवंत काडतूस व धारदार कुकरीसह दोघांना अटक !!
  • यावल तालुक्यात वादळाच्या तडाख्यात केळी बागा जमीनदोस्त !! आ अमोल जावळे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत प्रशासनाला आदेश !!

Recent Comments

  1. टीम पोलीस नायक on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
  2. Digambar Tayade on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
© 2026 - Police Nayak. All Rights Reserved.
Sign in
  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.