यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ जुलै २६ बुधवार
येथील प्रकल्पाधिकारी अरुण पवार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लालमाती तालुका रावेर येथे वृक्षारोपणाचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला.याच दिवशी वनविभाग रावेर आणि शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लालमाती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक व्याघ्र दिन देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यामुळे “दुग्धशर्करा योग” जुळून येत पर्यावरण संवर्धन व वन्यजीव संरक्षणाचा दुहेरी संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलींदर तडवी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे म्हणूनअरमान तडवी माजी सरपंच लालमाती उपस्थित होते. वनविभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी सुपडू सपकाळे,वनरक्षक शेखर चौधरी,अशरफ तडवी,हेमलता बारेला व उषा बारेला यांनी विद्यार्थ्यांना व्याघ्र संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि वृक्षसंवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली.पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येकी सामुहीक जबाबदारी असून वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.व्याग्रा हा आपल्या जंगलाचा समतोल राखणारा महत्वाचा घटक असल्याने त्याच्या संवर्धनासाठी सर्वानी जागरूक राहण्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक मनेश तडवी यांच्यासह सर्व शाळेचे शिक्षक व कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.