यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२७ जुलै २६ सोमवार
तालुक्यातील बोरखेडा पेसा अंतर्गत ग्रामपंचायतच्या माध्यमातून बोअरवेल व १५ वित्तच्या निधीतुन करण्यात आलेल्या गटारीचे बांधकाम निकृष्ठ प्रतिचे झाले असुन या कामांची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बोरखेडा खुर्द या आदिवासी गावात शासकिय पेसा अंतर्गत मिळालेल्या निधीतुन ग्राम पंचायत समोर परिसरात १५ वित्तच्या निधी सुमारे दोन लाख ८० हजार रुपये खर्चून गटारी चे बांधकाम करण्यात आले असुन सदरील हे काम अत्यंत निकृष्ट प्रतिचे करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे सुमारे तिन लाख २९ हजार रुपये निधी खर्च करून देखील बोअरवेल चे काम निकृष्ठ प्रतिचे झाले असल्याची ग्रामस्थांची ओरड असुन या कामांची त्वरीत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.