Just another WordPress site

विरावली-दहिगाव मार्गावरील समस्याबाबत अँड देवकांत पाटील यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२७ जुलै २६ सोमवार

विरावली-दहिगाव-सावखेडा मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी तसेच आवश्यक दिशादर्शक व वाहतूक सूचना फलक तात्काळ बसविणेत यावे याबाबतची मागणी अॅड. देवकांत बाजीराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (अ प ) पक्षाचे पदाधिकारी तथा अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन तथा माजी ग्रामपंचायत सदस्य विरावली यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपीक विकास जंजाळे यांच्याकडे करण्यात आली आहे.

यावल-विरावली-दहिगाव सावखेडा सिम या सार्वजनिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडांच्यामोठ मोठया फांद्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्या रस्त्यावर झुकल्या आहेत व त्यामुळे समोरील वाहने दिसत नाहीत.बस,ट्रक सारख्या मोठ्या वाहनांमधून प्रवास करणाऱ्यांना तसेच पावसाळ्यात फांद्या अधिक झुकल्याने अपघात होण्याचा धोका आहे.या मार्गावर शाळकरी मुले,महिला,ज्येष्ठ नागरिक,शेतकरी रोज प्रवास करतात.पण संपूर्ण मार्गावर दिशादर्शक फलक,वेग मर्यादा फलक,धोकादायक वळण फलक, शाळा परिसर फलक,गाव हद्द फलक यांचा अभाव असल्याने वारंवार या मार्गावर अपघात होतांना दिसत आहे व त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्यांना मार्गदर्शन मिळत नाही. सदरहू रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची तात्काळ छाटणी करावी,आवश्यक त्या ठिकाणी Direction फलक बसवावेत,Speed Limit फलक उभारावेत,Dangerous Curve सूचना फलक बसवावेत,School Ahead सूचना फलक बसवावेत तसेच गाव हद्द सुरु व समाप्त फलक व इतर वाहतूक व सुरक्षा विषयक फलक उभारण्यात यावे अशी मागणी अॅड. देवकांत बाजीराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (अ प ) पक्षाचे पदाधिकारी तथा अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन तथा माजी ग्रामपंचायत सदस्य विरावली यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपीक विकास जंजाळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.