शिरसुफळ दारू प्रकरणाने खळबळ !! ‘मोठ्या ओळखी’चा आधार की कायद्याची कठोर कारवाई ? संपूर्ण तालुक्याच्या नजरा आता पोलिसांच्या पुढील निर्णयाकडे !!
सनी पटेल, पोलिस नायक
पुणे जिल्हा विभागीय प्रमुख
दि.२७ जुलै २६ सोमवार
बारामती तालुक्यातील शिरसुफळ परिसरात अवैध दारू विक्री प्रकरणावर झालेल्या पोलिस कारवाईनंतर संपूर्ण तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.या कारवाईत संबंधितांवर पुढे कायदेशीर कारवाई होणार की नाही ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून पोलिस प्रशासनाच्या भूमिकेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्थानिक नागरिकांमध्ये अशी भावना व्यक्त केली जात आहे की,एखादा सर्वसामान्य किंवा गरीब व्यक्ती अशा प्रकरणात सापडल्यास त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाते.मात्र प्रभावशाली ओळखी असल्याची चर्चा असलेल्या व्यक्तींवरही त्याच पद्धतीने कायदेशीर कारवाई होणार का ? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.या प्रकरणात पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे.त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल होणार का ? अटक होणार का ? की तपासानंतर पुढील निर्णय घेतला जाणार ? याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
कायदा सर्वांसाठी समान आहे हे केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीतही दिसले पाहिजे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.कोणत्याही व्यक्तीचा सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय प्रभाव न पाहता उपलब्ध पुराव्यांच्या आधारे निष्पक्ष आणि पारदर्शक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.या प्रकरणात पुढील तपास पूर्ण झाल्यानंतरच सत्य समोर येईल आणि त्यानुसार पोलिस प्रशासन कायदेशीर निर्णय घेईल त्यामुळे संपूर्ण तालुक्याच्या नजरा आता पोलिसांच्या पुढील अधिकृत कारवाईकडे लागल्या आहेत.