Just another WordPress site

माळेगाव परिसरात खुलेआम गुटखा विक्री !! तुकाराम मुंढे यांच्या कठोर भूमिकेनंतरही कारवाईचा अभाव !!

सनी पटेल,पोलीस नायक

पुणे जिल्हा विभागीय प्रमुख

दि.१० जुलै २६ शुक्रवार

राज्यात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कठोर भूमिका घेत अवैध गुटखा विक्रेत्यांवर मकोका लावण्याचेही निर्देश दिले आहेत.राज्यभरात धाडी,जप्ती आणि गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू असतानाही बारामती तालुक्यातील माळेगाव परिसरात मात्र खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अनेक पानटपऱ्या,किराणा दुकाने आणि काही ठिकाणी लपवून ठेवलेल्या साठ्यातून ग्राहकांना सहज गुटखा उपलब्ध होत आहे.बंदी असलेल्या पदार्थांची इतक्या उघडपणे विक्री होत असताना संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

राज्यभरात गुटखा माफियांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले गेले असताना माळेगावमध्ये मात्र परिस्थिती वेगळी का ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अवैध विक्रीकडे दुर्लक्ष होत आहे का ? की संबंधित विभागाच्या कारवाईत सातत्याचा अभाव आहे ? अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

गुटखा विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असून तोंडाचा कर्करोग व इतर गंभीर आजारांचा धोका वाढत आहे.त्यामुळे केवळ आदेश देऊन न थांबता प्रत्यक्ष मैदानात उतरून अवैध विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

माळेगाव परिसरातील अवैध गुटखा विक्रीची तातडीने चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच अशा व्यवसायाला संरक्षण देणाऱ्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.