Just another WordPress site

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट !! पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून गंभीर प्रश्न !!

सनी पटेल,पोलीस नायक

पुणे जिल्हा विभागीय प्रमुख

दि.०४ जुलै २६ शनिवार

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू,मटका,गुटखा आणि इतर बेकायदेशीर धंदे सुरू असल्याच्या तक्रारींमुळे परिसरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी हे प्रकार सुरू असल्याचे दिसून येत असतानाही त्यांच्यावर प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे.यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे व ती म्हणजे अवैध धंदे सुरूच राहतात मग कारवाई नेमकी कुठे होते ? कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडून अधिक कडक आणि सातत्यपूर्ण कारवाईची अपेक्षा असताना अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी कायम राहिल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

स्थानिकांचे म्हणणे आहे की,अशा प्रकारांमुळे तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत आहे.अवैध दारू आणि गुटखा विक्रीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत तर मटका आणि इतर जुगार प्रकारांमुळे अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.नागरिकांच्या मते,अशा धंद्यांवर कठोर कारवाई झाली तरच या प्रकारांना आळा बसू शकतो.नागरिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून वास्तव परिस्थिती समोर आणावी,संबंधित भागात विशेष तपास मोहीम राबवावी आणि ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याचे आढळेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

सदरहू कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडून पारदर्शक आणि प्रभावी कारवाईची अपेक्षा प्रत्येक नागरिकाची आहे.त्यामुळे या तक्रारींची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी आणि जर अवैध प्रकार सुरू असल्याचे आढळले तर कोणालाही पाठीशी न घालता कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशीही मागणी जोर धरत आहे.या प्रकरणाबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याची अधिकृत प्रतिक्रिया मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.