यावल शहरातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जुन्या विहिरी तात्काळ सुरू करावी !! शिवसेना गटनेते सागर चौधरींची मागणी
यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जून २६ रविवार
येथील शहराला दरवर्षी हातनूर धरणाच्या आवर्तनातून पाणीपुरवठा केला जात होता.मात्र यावर्षी गंभीर संभाव्य पाणीटंचाई मुळे हातनूर धरणातून आवर्तन सोडण्यात येत नसल्याने शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
यावल शहरात पूर्वी वापरात असलेल्या अनेक जुन्या विहिरी आज ही अस्तित्वात आहेत. तरी या विहिरींची साफसफाई, दुरुस्ती व आवश्यक यंत्रणा बसवून या विहिरी पुन्हा कार्यान्वित केल्यास शहरातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होऊ शकते त्यामुळे नागरिकांना नियमित व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल.तरी आपण यावल शहरातील सर्व जुन्या विहिरींचे तात्काळ सर्वेक्षण करून त्यांची दुरुस्ती, स्वच्छता व पाणी उपसा यंत्रणा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.आपण या जनहिताच्या मागणीची तातडीने दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे असे लिखित पत्र यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांना सागर चौधरी नगरसेवक गटनेता (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) सौ वैशाली निलेश बारी नगरसेवक यावल नगरपालिका यांनी केली आहे .