यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जून २६ रविवार
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष यावल मंडळाच्या वतीने रावेर यावल तालुक्याचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत योगाभ्यास करून निरोगी जीवनाचा संदेश दिला.
या कार्यक्रमासाठी योग शिक्षक ईश्वर पाटील सर यांनी योगाचे महत्त्व व विविध योगासने याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजक पी. एस. सोनवणे सर तर सहसंयोजक म्हणून भूषण फेगडे यांनी जबाबदारी सांभाळली.या प्रसंगी यावल तालुका खरेदी विक्री शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन नारायण बापू चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, यावल नगर पालिके च्या गटनेत्या नंदाताई महाजन, नगरसेविका शुभांगी येवले, माजी भाजपा तालुकाध्यक्ष व नगरसेवक उमेश फेगडे, दिलीप वाणी, मुकेश कोळी, वीर येवले, पप्पू कासार, संजय फिरके, उज्वल कानडे, पिंटू फेगडे, संजय भोईटे आदी उपस्थित होते.
यावेळी योगामुळे शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते, असा संदेश देण्यात आला. निरोगी भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करावा, असे आवाहन करण्यात आले.
सदरचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा यावल मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.