Just another WordPress site

भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या जळगाव पुर्व जिल्हाध्यक्षपदी नारायण चौधरी यांची निवड !!

यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :-

दि.११ ऑगस्ट २६ मंगळवार

तालुक्यातील भालोद येथील प्रगतीशील शेतकरी व यावल तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघाचे चेअरमन तसेच यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक तथा राज्य शासनाच्या कृषीभुषण या पुरस्काराने सन्मानित नारायण ( बापु ) शशीकांत चौधरी यांची भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्ष जळगाव पुर्व किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी नारायण बापु चौधरी यांच्या निवडीचे केन्द्रीय क्रिडामंत्री ना.रक्षाताई खडसे,महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती मंत्री ना गिरीष महाजन,राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे,रावेर यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे,जळगावचे आमदार राजु मामा भोळे,जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कार,जिल्हा उपाध्यक्ष शरद जिवराम महाजन,जेष्ठ पदाधिकारी हिरालाल चौधरी,जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील,फैजपूर मंडळ अध्यक्ष उमेश बेंडाळे,यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी,डॉ नरेन्द्र कोल्हे,नगरसेवक उमेश फेगडे,राकेश कोलते यांच्यासह आदि पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.