Just another WordPress site

कोरपावली ग्रामपंचायतच्या वतीने वृक्षारोपण करीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१० ऑगस्ट २६ सोमवार

तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजातील थोर महापुरुष समाज सेवक तंट्या मामा,ख्वाजा नाईक,बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सरपंच तथा प्रशासक विलास नारायण अडकमोल,कृउबाचे संचालक राकेश फेगडे,मुनाफ तडवी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी राज्यघटनेचे शिल्फकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाला हार अर्पण करून गावातील मुख्य चौकातील हजरत पीर गैबनशाह बाबा यांच्या दर्गा येथे चादर चढवण्यात आली.यावेळी जागतिक आदिवासी दिनाचे अवचित्य साधून मान्यवर मंडळींच्या हस्ते गावात विविध २०० वृक्षांची लागवड करण्यात आली.यात मराठी शाळा परिसर व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलका जवळ तसेच वयक्तिक लोकांना वृक्ष देऊन वृक्षारोपण करण्यात आले व त्यांचे संवर्धन करण्याचे सांगितले.या निमित्त गावातील प्रशासक सरपंच विलास अडकमोल,उपसरपंच हमीदा पटेल,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक राकेश वसंत फेगडे,ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी,अफरोज पटेल,ग्रामपंचायत अधिकारी रिषीकेश देवकर,समाजसेवक मुक्तार पटेल,आदिवासी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते मुनाफ तडवी तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व ग्रामपंचायत कर्मचारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.