Just another WordPress site

आदिवासी एकता मंच या आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या संघटनेतर्फे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.११ ऑगस्ट २६ मंगळवार

आदिवासी एकता मंच महाराष्ट्र राज्य या आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या संघटनेतर्फे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करीत गेल्या बारा वर्षापासून ढोल ताशांच्या गजरात एकता मंचची निघणारी रॅलीने मिरवणुकीदरम्यान यावल नगरीत तडवी भिल्ल वाघांच्या गर्दीने इतिहास घडवला.सदरील मिरवणूक यावल शहरात टीव्हीएस शोरूम ते आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल पर्यंत गर्दीचा अलोट सागर बघायला मिळाला.प्रारंभी आदिवासी एकता मंच रॅलीचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी अरुण पवार प्रकल्प अधिकारी यावल व नगराध्यक्षा छाया पाटील व नगरसेवक अतुल पाटील यांच्या शुभ हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पूजन करून व आदिवासी शस्त्र पूजन करून तसेच  जननायक तंट्या मामा भिल्ल यांच्या प्रतिमेस फुलहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली.

सदरील रॅलीमध्ये तडवी भिल्ल समाजात होऊन गेलेले हुतात्मे यांच्या माहितीचे फ्लेक्स लावण्यात आले.जननायक तंट्या मामा भिल्ल यांचे पुतळ्या माहिती देणारे फ्लेक्स लावण्यात आले.जननायक तंट्या मामा भिल्ल यांच्या प्रतिमेस अभिवदन करण्याकरिता विशिष्ट पद्धतीने चबुतरा तयार करण्यात आला.रॅलीमध्ये ‘जय आदिवासी’ या घोषणा सतत चालू होत्या.रॅलीमध्ये कठोरा येथील युवक न्याजोजुद्दीन तडवी व त्याचे सहकारी हे पुरातन आदिवासीचा पेहराव केला होता व हे प्रामुख्याने आकर्षण ठरत होते.यावल तडवी कॉलनीतील युवकांनी बिरसा मुंडाचा वेश परिधान केल्याने सेल्फी पॉइंट करत होते.रॅलीमध्ये काही युवक आदिवासी मिकी माऊसचा ड्रेस परिधान करून लहान मुलांचे आकर्षण ठरत होते.रॅली बुरुंज चौकात पोचल्यावर तिथे भीम आर्मीच्या युवकांनी रॅलीचे स्वागत केले तसेच आदिवासी एकता मंचकडून बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व अभिवादन करण्यात आले.आमदार अमोल जावळे यांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवित महानायक बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट दिली.तर धनंजय चौधरी हे एकता मंचच्या रॅलीत युवकांसोबत थिरकतांना दिसले.सदरील रॅलीच्या वतीने प्रकल्प कार्यालयाच्या आवारात ठेवलेल्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले व यानंतर एकता मंच सोबत असलेल्या जननायक तंट्या मामा भिल्ल यांच्या पुतळ्यावर रोषणाई तसेच फुलांचा वर्षाव व फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे ‘ना भूतो न भविष्य ती’असे वातावरण पाहायला मिळाले.दरम्यान प्रकल्प कार्यालयातील सहायक प्रकल्प अधिकारी माहुरे साहेब यांच्या उपस्थितीत तंट्या मामा भिल्ल यांच्या प्रतिमेचे ढोल ताशांच्या गजरात पूजन करून रॅलीचे विसर्जन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.