यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०८ ऑगस्ट २६ शनिवार
उद्या दि.९ ऑगस्ट रविवार रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी टोकरे कोळी जमाती च्या वतीने यावल येथे भव्य सांस्कृतिक रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यावल शहरातील फैजपूर रोडलगत असलेल्या मनुदेवी मंदिरापासुन सकाळी ९.३० वाजता भव्य सांस्कृतिक रॅलीला सुरुवात होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.यावेळी जळगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.शांताराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तर यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे व माजी जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या हस्ते सांस्कृतिक रॅलीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष साळुंखे,माजी सरपंच यशवंत सपकाळे,भाजपा अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष हरलाल कोळी,पंचायत समितीचे माजी सदस्य विलास तायडे,जितेंद्र सपकाळे,भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी,बबलू कोळी,नितीन सपकाळे,नगरसेविका सविता नन्नवरे,माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांच्यासह मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.तसेच भव्य सांस्कृतिक रॅलीची सुरुवात मनुदेवी मंदिर येथून होऊन तिची सांगता यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात होणार आहे.रॅलीमध्ये आदिवासी संस्कृती,परंपरा व कला यांचे दर्शन घडणार आहे.या कार्यक्रमास जिल्ह्यातील आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप कोळी,उपाध्यक्ष निकिता कोळी,दीपक कोळी,मुकेश कोळी,खजिनदार खेमचंद कोळी तसेच समितीतील सदस्यांनी केले आहे.