Just another WordPress site

रावेर विधानसभा शिंदे शिवसेना गट युवा सेना संपर्क प्रमुखपदी यावलचे राहुल बारी यांची नियुक्ती !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१४ मे २६ गुरुवार

येथील युवा नेतृत्व व सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे राहुल पंढरीनाथ बारी यांची शिवसेना शिंदे गट युवा सेना रावेर विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुखपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

दरम्यान हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर आनंद दिघे आणि माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना कार्याध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या विनंतीनुसार एस आय आर प्रक्रिया व मतदानयादी प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आणि युवासेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यासाठी विधानसभा युवा सेना संपर्कप्रमुख यांच्या नियुक्ती करण्यात येत आहे त्यात रावेर विधानसभा युवासेना संपर्क प्रमुखपदी राहुल पंढरीनाथ बारी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र पक्षातर्फे त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.राहुल बारी यांनी मागील महिन्यातच भाजपला सोडचिठ्ठी दिली होती व आता त्यांची शिवसेना शिंदे गट युवा सेना रावेर विधानसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.