Just another WordPress site

राज्यासह व जिल्ह्यात क्यु आर कोड जन्म-मृत्यु दाखले मिळण्यास विलंबाबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१३ ऑगस्ट २६ गुरुवार

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी पूर्वी दिलेल्या जुन्या जन्म-मृत्यू दाखल्यांवर QR Code नसल्यामुळे सध्या विविध शासकीय,शैक्षणिक,बँकिंग व पासपोर्टच्या कामांसाठी हे दाखले अमान्य केले जात असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे रावेर लोकसभा जळगाव जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी मुंबई येथील ‘देवगिरी’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री ना.सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांना नुकतेच अधिकृत निवेदन सादर केले.

केवळ QR Code नाही या कारणावरून नागरिकांचे जुने व अधिकृत दाखले नाकारले जाऊ नयेत असे स्पष्ट निर्देश सर्व शासकीय व निमशासकीय विभागांना देण्यात यावे,जुन्या नोंदवहीतील नोंदींची पडताळणी करून नागरिकांना QR Code सह नवीन दाखले देण्यासाठी राज्यभरात एकसमान मार्गदर्शक सूचना (Guidelines) जारी करण्यात याव्या,अनेक संस्थांमधील जुन्या व जीर्ण नोंदवह्यांचे तातडीने डिजिटायझेशन (Digitization) करून त्या राज्य नोंदणी प्रणालीवर उपलब्ध करून द्याव्या,
सर्वसामान्य नागरिकांची होणारी अडवणूक थांबवण्यासाठी शासनाने तातडीने स्वतंत्र शासन निर्णय (GR) काढून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अंमलबजावणीचे आदेश द्यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सदरहू उपमुख्यमंत्री ना.सुनेत्रा पवार यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेत संबंधित विभागाशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे रावेर लोकसभा जळगाव जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांना दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.