नगरसेविकेच्या तक्रारीची दखल घेत यावल नगराध्यक्ष छाया पाटील यांनी नदीपात्रात कर्मचाऱ्यांकडून केली तात्काळ स्वच्छता !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ ऑगस्ट २६ गुरुवार
शहरातून वाहणाऱ्या हडकई नदीपात्रात गेल्या अनेक दिवसांपासुन मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले होतेव नदीपात्रात सर्वत्र दुर्गंधीची घाण साचली होती तसेच नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढल्याने नदीचा परिसर अस्वच्छ झाला होता.या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीच्या अस्वच्छतेमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
यावेळी यावल नगरपालीकेच्या नगरसेविका रूबीना कच्छी व समाजीक कार्यकर्ता उमर कच्छी यांनी नागरी व समाजहिता च्या दृष्टीने या समस्येची दखल घेत यासंदर्भात यावल नगर पालीकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया पाटील तसेच माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगर सेवक अतुल पाटील यांच्याकडे तक्रार केली.सदरहू या समस्याचे गांर्भीय लक्षात घेत नगराध्यक्ष छाया पाटील यांना हडकई नदीच्या पात्राची तातडीने स्वच्छता करण्याची कार्यवाही केली.नगरसेविका रूबीनाबी कच्छी यांच्या तक्रारीची नगराध्यक्ष छाया पाटील यांनी तात्काळ दखल घेत यावल नगरपालिकेच्या माध्यमातून जेसीबी मशीन तसेच नगरपालीकेच्या माध्यमातून नदीपात्रात कर्मचाऱ्यांना पाठवून युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम राबविली.तसेच नदीपात्रातील वाढलेली झाडेझुडपे,कचरा व इतर अडथळे हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला.