Just another WordPress site

यावल शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत बजरंग दलाचे प्रशासनाला निवेदन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०६ ऑगस्ट २६ गुरुवार

शहरातील नगर पालिका कार्यक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर मोकाट गुरे शहरातील मुख्य चौक व प्रमुख रस्त्यावर मोकाट फिरत असून यामुळे वाहतुकीस अडथळा व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.नगरपालीकेने या संदर्भात तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी मुख्याधिकारी निशिकांत गवई यांचेकडे बजरंग दलाच्या वतीने राजेन्द्र बडगुजर यांच्यासह सदस्यांच्या वतीने नुकतीच करण्यात आली.

सदर दिलेल्या निवेदनात बजरंग दलने म्हटले आहे की,शहरातील मुख्य रस्ते,चौक,बाजारपेठेत मोकाट गुरे फिरत असल्याने वाहनधारकांच्या वाहनांचे अपघाताची शक्यता वाढली आहे.दुचाकीस्वार,पादचारी,लहान शाळकरी मुलांना या मोकाट गुरांचा त्रास होत आहे तर काही दिवसांपूर्वी सांगवी या गावात दोन गाड्यांना विजेचा धक्का लागून जनावराचा मृत्यू झाला होता अशा घटना पुन्हा घडू नयेत.दरम्यान शहरातील सर्व मोकाट जनावरांची नोंद करून त्यांचा बंदोबस्त करावा.टॅग लावणे जी जनावरे मालकीची आहेत त्यांना ओळखीसाठी टॅग लावावा.जनावरांना मालक असतील तर त्यांना नोटीस देऊन त्यांचे जनावरे ताब्यात देवुन गोठ्यात बांधण्याचे आदेश द्यावेत.दंडात्मक कारवाई नोटीस देऊन ही जनावरे रस्त्यावर आढळल्यास मालकावर कारवाई करावी.बेवारस जनावरांना तात्काळ गोशाळेत दाखल करण्याची व्यवस्था करावी.सुरक्षा विजेचे तार,खांब व धोकादायक ठिकाणांची तपासणी करून जनावरांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाय योजना करावेत.सदरील मागण्या तातडीने अंमलात न आल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी व गोमातेच्या रक्षणासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषदेची राहील असा ईशारा बजरंग दलाच्या वतीने देण्यात आला आहे.यावेळी तालुका संयोजक राजेन्द्र बडगुजर,भाजपा नगर पालिका गटनेत्या नंदा महाजन,हेमंत बडगुजर,ईश्वर माळी,प्रसाद बिरारी,गोपाळ बैरागी,पंकज चौधरी,निशु भोईटे,कृष्णा रोहम इत्यादी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.